मोहिनी एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात मोगऱ्याचा बहर ; मनमोहक सजावट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २३ मे ।आज वैशाख शुद्ध एकादशी अर्थात मोहिनी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.आजचा हा योग शेकडो वर्षातून आला असून आजच एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा दुर्मिळ तिहेरी योग जुळून आल्याने याला त्रिस्पर्ष वंजुला महाद्वादशी असे म्हणाले जाते.

आज सकाळी पावणेसातपर्यंत सूर्याने पाहिलेली मोहिनी एकादशी आहे. नंतर दिवसभर द्वादशी आणि मध्यरात्री 3 वाजून 38 मिनिटांनी त्रयोदशी लागत असल्याने तीनही दिवसांचा दुर्मिळ योग शेकडो वर्षांनी एकत्र आल्याने वारकरी संप्रदायात याला खूप महत्त्व आहे.याच दिवसाचे औचित्य साधून पुणे येथील भाविक नानासाहेब दिनकरराव परचुंड पाटील यांनी मोगरा, गुलाब, झेंडू आणि अश्टरच्या फुलांनी विठ्ठल मंदिर सजवले आहे.

मोगऱ्याच्या सुगंधी फुलांचे पडदे आणि मंडप चौखंबीमध्ये केला असून मोगरा आणि गुलाबाची आकर्षक रंगसंगती वापरून विठ्ठल रुक्मिणी गाभाराही सजविला आहे.या सुगंधी फुलांच्या सुवासाने विठ्ठल मंदिर दरवळून निघाले असून लॉकडाऊनमुळे भाविकांसाठी मंदिर बंद असले, तरी देवाचे परंपरागत उपचार मात्र सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *