महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । भारतीय लग्नकार्यांमध्ये सोने खरेदीला मोठे महत्व असते. त्यामुळे या दिवसांमध्ये सोने खरेदीत तेजी असते. सध्या खरेदीदार ऑनलाईन किंवा ठराविक वेळेत सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत.
किरकोळ खरेदीदारांसह मोठे गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये सध्या गुंतवणूकीला प्राधान्य देत आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. गुरूवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी जास्त होणारे भाव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असतो.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचे दर 48 हजार 439 रुपये प्रतितोळे इतका होता. MCX मध्ये कालच्या तुलनेत हा दर 130 रुपये प्रतितोळे घसरल्याचे दिसून आले. मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार इतका होता. हा दर गेल्या 2-3 दिससांपासून स्थिर आहे.