महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती न्यायालयासमोर मांडू, असंही त्या बोलताना म्हणाल्या. आज सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.