महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट भयंकर आली. IPLच्या बायो बबलमध्ये कोरोना घुसला आणि 4 खेळाडू 2 कोच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर IPL 2021चे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले. आता 31 उर्वरित सामन्यांच्या तारखा जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
IPLच्या 31 उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक हे टी 20 वर्ल्डकपआधी करण्यात येणार असल्याची चर्चा आहेत. त्यानुसार बीबीसीआय इंग्लंड किंवा UAEचा पर्याय शोधत आहे. UAEमध्ये IPLचे सामने घेण्याबाबत सध्या BCCI जास्त फोकस करत आहे. त्यानुसार नियोजन करण्यावर भर दिला जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार BCCI 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान उर्वरित 31 सामन्यांसाठी नियोजन करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांनंतर IPLचे सामने नियोजनित करण्यात येतील. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामने सुरू होणार आहेत.