महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 24 मे । भारतीय लग्नकार्यांमध्ये सोने खरेदीला मोठे महत्व असते. त्यामुळे या दिवसांमध्ये सोने खरेदीत तेजी असते. सध्या खरेदीदार ऑनलाईन किंवा ठराविक वेळेत सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत. मजबूत जागतिक निर्देशांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकन चलन डॉलरची घसरण आणि वाढती महागाई यांच्या दबावामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. व्यापार सत्रादरम्यान, जून वायदा सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर, जुलै वायदा चांदीच्या किंमतीत प्रतिकिलो 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे (Gold Silver Rate Today on 24 May 2021 MCX Rates).
सोन्याचा नवा दर (Gold Rate) : सोमवारी एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याची किंमत 131 रुपयांनी वाढून 48,535 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. मागील व्यापार सत्रात, 10 ग्रॅम सोन्याचे दर 0.22 टक्क्यांनी घसरले होते.
चांदीची नवीन किंमत (Silver Rate) : व्यापार सत्रादरम्यान जुलै वायदा चांदीची किंमत 418 रुपयांनी वाढून 71,467 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात चांदीच्या किंमतीत 1.7 टक्क्यांनी घट झाली होती.
गोल्ड बाँडच्या दुसर्या सीरीजची विक्री सुरू
सॉवरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond) दुसर्या सीरीजची विक्री आजपासून सुरू झाली आहे. ते 28 मेपर्यंत विकले जातील. दुसर्या सीरीजची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,842 रुपये आहे.
सॉवरेन गोल्ड बाँडसाठी ऑनलाईन अर्ज करणारे आणि डिजिटल मोडमध्ये पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यूच्या किंमतीवर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळते. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या बाँडचा इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,792 रुपये असेल.