महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला (Rain) सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Heavy rain expected in Pune on Tuesday evening )
तर दुसरीकडे मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर साधारण 1 जूनच्या आसपास मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 ते 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येऊन स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.