Yellow Fungus: पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण सापडला ; काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा ‘पिवळी बुरशी’ अधिक धोकादायक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । गाझियाबादमध्ये पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण सापडला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा पिवळी बुरशी अधिक धोकादायक आहे.पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीमध्ये पिवळी बुरशी आढळल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गाझियाबादमध्ये सापडलेला रुग्ण ४५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच तो करोना संक्रमणमुक्त झाला होता. या रुग्णाला रक्तशर्करेचाही त्रास आहे. त्रास जाणवू लागल्यानंतर गाझियाबादच्या एका ईएनटी सर्जनकडे हा रुग्ण तपासणीसाठी गेला होता. रुग्णाची तपासणी करताना डॉक्टरांच्या ही ‘पिवळी बुरशी’ असल्याचं ध्यानात आलं.

डॉ. बी पी त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला अत्यंत सुस्ती जाणवत होती तसंच त्याची भूकही कमी होत गेली. वजनही कमी झालं तसंच डोळ्यांची दृष्टीही अंधूक होत चालली होती. सीटी स्कॅनमध्ये बुरशी असल्याचं समोर आलं. नेजल इंडोस्कोपी केल्यानंतर रुग्णाला काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीचा त्रास जाणवत असल्याचं स्पष्ट झालं.

पिवळी बुरशी अर्थात यलो फंगस अंतर्गत भागात सुरू होते आणि दुर्लक्ष केल्यास दिवसेंदिवस हा आजार धोकादायक बनत जातो. घरात दमट वातावरण असल्यास बॅक्टेरिया आणि बुरशीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपल्या घराची साफसफाई अत्यंत आवश्यक आहे. तसंच शिळं अन्न रुग्णांनी खाऊ नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *