उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान:’मातोश्री’बाहेर मनसेची पोस्टरबाजी,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोरांविद्धचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर पोस्टर लावून थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करून राज ठाकरे हे शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मनसे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून पक्षाचे सर्व शिलेदार कामाला लागले आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेची भूमिका मवाळ झाल्याचं बोललं जातंय.

मनसेने आपल्या पोस्टरमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्री साहेब घुसखोरांना हाकलण्याची खरच तुमची इच्छा असेल तर आधी तुमच्या वांद्र्यातल्या अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं थेट आव्हानच मनसेने मुख्यमंत्र्यांना दिल्याचं बोललं जातंय. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अखिल अनिल चित्रे यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

भाजपची मिळणार मनसेला साथ हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता भाजप कामाला लागलं असून मनसेच्या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. मनसेच्या महाशिबिरातच राज ठाकरेंनी त्याबाबत घोषणा केली होती. शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता मनसेला मदत करणार असल्याचं बोललं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *