महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) वाढ केली आहे. सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे सामान्यांच्या चिंतेत आणखी वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलही जवळपास याच दराने वाढलं आहे. रविवारी पेट्रोलचे दर 15 ते 17 पैसे दर डिझेलचे दर 25 ते 29 पैशांनी महागले होते.
>> दिल्लीमध्ये पेट्रोल 93.44 रुपये आणि डिझेल 84.32 रुपये प्रति लीटर
>> मुंबईमध्ये पेट्रोल 99.71 रुपये आणि डिझेल 91.57 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 95.06 रुपये आणि डिझेल 89.11 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 93.49 रुपये आणि डिझेल 87.16 रुपये प्रति लीटर