महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । जेवणाचं चांगलं पचन (Digestion) व्हावं यासाठी मिरपूडबरोबर खडीसाखर खावी. यामुळे पचन संबंधीत सर्व समस्या दूर होतील. काळं मिरी (Black Pepper) आणि खडीसाखर (caster sugar) एकत्र खाल्याने आरोग्याला फायदा (Healthy Benefits) होतो.
काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, बीटा केरोटीन, व्हिटॅमिन ए, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म, अँटीऑक्सिडेंट्स, सेलेनियम असतात. तर खडी साखरेत व्हिटॅमिन बी 12, फायबर, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने बर्याच प्रकरणात शरीराला फायदा मिळतो. या मिश्रणाच्या सेवनामुळे आरोग्यास किती फायदा होतो हे पाहुयात.
मेंदूसाठी फायदेशीर – जर स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल किंवा मानसिक तणाव जाणवत असेल तर त्या व्यक्तीने मिरपूड आणि खडीसाखर खावी. याने मानसिक थकवा दूर होईल आणि स्मरणशक्तीही चांगली होईल. मिरपूड आणि खडीसाखरेच्या सेवनाने झोपेची समस्या देखील दूर होते. फ्रेश वाटत नसेल तर आपलं मन ताजतवानं करण्यासाठी हे मिश्रण खा.
वजन कमी करण्यासाठी – काळी मिरी आणि खडीसाखर एकत्र खाल्ली तर वजन कमी करण्यास मदत होते. मिरपूडच्या वरच्या थरांवर फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे शरीरातील चरबीच्या पेशी तोडण्याचं काम करतात. तर खडीसाखर पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि भूक नियंत्रण करण्यांच काम करते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मिरपूड आणि खडीसाखरेचं मिश्रण खाऊ शकता.
घशातील समस्या दूर – खडीसाखर आणि तुपाचे काही थेंब काळी मिरी पावडरमध्ये मिसळून खाल्ल्यास आपल्या घशात आराम मिळेल. या चाटणाने खोकल्यामध्ये त्वरित आराम मिळतो. काळी मिरी घशातील कफ काढून टाकण्यासाठी खूप मदत करते.
शरीर आणि मेंदूला त्वरित ऊर्जा – मिरपूड आणि खडीसाखर यांचं मिश्रण घेतल्याने तणाव कमी होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जादेखील मिळते. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होऊ शकतो.