महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । जर तुमचेही कॅनरा बँकेत खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड (IFSC Code) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी येत्या 30 जूनपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड अपडेट करावा, असे आदेश कॅनरा बँकेने दिले आहेत. (Syndicate Bank IFSC Codes Will Be Disabled From 1 July 2021)
काही महिन्यांपूर्वी कॅनरा बँकेचं सिंडिकेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले. यानंतर सिंडिकेट बँकेने केलेल्या ट्वीटनुसार, SYNB पासून सुरु होणारे eSyndicate IFSC कोड बदलण्यात आले आहेत. SYNB ने सुरु होणारे सर्व IFSC W.E.F 01.07.2021 पासून बंद करण्यात येतील.सिंडिकेट बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही NEFT/RTGS/IMPS पाठवताना केवळ CNRB ने सुरु होणारा नवीन आयएफसी कोडचं वापरावा, अशी विनंती ग्राहकांना केली आहे.
1 एप्रिलपासून जुने कोड बंद
गेल्या एप्रिल 2020 पासून अनेक बँकांचे विलीनीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत नवीन IFSC आणि MICR कोड जारी केले आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व जुन्या बँकांचे आयएफसी कोड 1 एप्रिल 2021 पासून बंद केले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याद्वारे व्यवहार करता येणार नाही.
IFSC कोड म्हणजे काय?
कोणत्याही ऑनलाईन व्यवहारांसाठी बँक खाते क्रमांकासह बँकेचा आयएफएससी कोड असणे अनिवार्य आहे. बँकांचा आयएफएससी कोड हा 11 अंकांचा असतो. यात सुरुवातीची चार अक्षरे हे बँकेचे नाव दर्शवितात. IFSC कोडचा वापर NEFT आणि RTGS साठी केला जातो. (Syndicate Bank IFSC Codes Will Be Disabled From 1 July 2021)