महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । भारतीय बाजारात असे AC आहेत, जे सोलर पॉवरवर चालतात. हे सूर्याच्या किरणांपासून एनर्जी घेऊन वीज बनवतात आणि त्यानंतर बॅटरी चार्ज करतात. हे सोलर एसी, सामान्य एसीच्या तुलनेत महाग असतात. परंतु अधिक काळापर्यंत वापरासाठी विचार केल्यास, हे सोलर एसी चांगला पर्याय ठरतात.
SINFIN 1.5 Ton Solar PCU Split Inverter AC –
कंपनीचा हा 1.5 टनचा AC ऑटो अॅडजस्ट आणि स्लीप मोडसह येतो. चांगल्या कुलिंगसाठी या एसीमध्ये कॉपर कंडिशनिंगचा वापर करण्यात आला आहे. हा एसी एनर्जी एफिशिएंट आणि Easy मेंटनेंससह येतो.
Onyx 1.5 Ton Hybrid Split Solar AC –
1.5 टनचा हा एसी चांगल्या कुलिंगसह येतो. या एसीमध्ये इको फ्रेंडली प्लास्टिक, 100 टक्के कॉप क्वाईल, डबल ऑटो स्विंग, ऑटो शट फ्लॅप्स, ऑटो रिस्टार्ट, फॉर्वर्ड एअर थ्रो आणि ऑटोमेटिक फ्लॅप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय यात स्वीपर टाईम आणि ऑटोमेटिक एअर फ्लो अॅडजस्टमेंटही देण्यात आलं आहे.
Split Metallic Teramax सोलर AC –
कंपनीचा हा मेटॅलिक स्प्लिट एसी 0.75 ते 1, 1.5 आणि 2 टनपर्यंतच्या कॅपेसिटीसह येतो. या AC मध्ये DC 48 V वोल्टेज देण्यात आलं आहे, ज्याचं पॅनल पॉवर 300W आणि 325 W आहे. हा सोलर एसी 55000 रुपयांच्या किंमतीपासून मिळतो.
Metallic सोलर AC –
हा एसी 1.5 टन कॅपेसिटीसह येतो, ज्यात 48/220 वोल्टेज देण्यात आलं आहे. हा AC 5 स्टार रेटिंगसह येतो, ज्याचं पॅनल पॉवर 2000 WATT आहे. BLDC फॅन कुलरवाल्या या एसीची सुरुवातीची किंमत 45,000 रुपये आहे.
Apna Plastic/Fibre SWAY20 सोलर AC –
2 टनवाल्या या AC मध्ये 48/220 वोल्टेज देण्यात आलं आहे. हा स्प्लिट एसी प्लास्टिक फायबरसह येतो, ज्याची सुरुवातीची किंमत 52,135 रुपये आहे.
तुम्ही 5 स्टार रेटिंगवाला 1.5 टनचा स्प्लिट AC घेतल्यास, यामुळे ताशी जवळपास 1490W विजेचा वापर होतो. विजेच्या यूनिटच्या हिशोबाने या AC साठी ताशी जवळपास 1.5 यूनिट विजेचा वापर होतो. जर 12 तास AC चालवला, तर 18 यूनिट विज वापरली जाते. तुमच्या भागातील विजेच्या दरानुसार याचा हिशोब करू शकता. दिल्लीत 7.50 रुपये यूनिट हिशोबाने, जवळपास 135 रुपये प्रतिदिन बिल येऊ शकतं.