१५ वर्षे जुने ट्रॅक्टर भंगारात जाण्यापासून वाचविता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने प्रदूषणात घट व्हावी, पारंपारिक इंधन बचत व्हावी यासाठी १५ वर्षापेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्याची सुधारणा मोटर वाहन नियम कायद्यात केली आहे मात्र कृषी क्षेत्रात वापरले जाणारे ट्रॅक्टर तसेच हार्वेस्टर सारखी अन्य उपकरणे या नियमातून वाचविण्याची संधी शेतकरी वर्गाला मिळणार आहे. त्यासाठी त्यांना ही वाहने सीएनजी, बायो सीएनजी, एलएनजी वर बदलून घ्यावी लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या इंधन खर्चात बचत होईल शिवाय वाहने भंगारात जाणार नाहीत आणि वायू प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे.

केंद्रीय रस्ते परिवहन राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ज्या शेतकी उपयुक्त वाहनांच्या इंजिनात किरकोळ बदल करून सीएनजी वर करता येतील अशी वाहने त्यामुळे वापरात राहतीलच पण ज्या वाहनाचे इंजिन खुपच जुने आहे अशी वाहने सुद्धा नवीन सीएनजी इंजिन बसवून वापरता येतील. यामुळे पारंपारिक इंधनची बचत होणार आहे आणि शेतकऱ्याची वर्षाला एक ते दीड लाखाची बचत होऊ शकणार आहे.

नितीन गडकरी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये डिझेल इंजिन कडून सीएनजी परिवर्तीत केलेला भारतातला पहिला ट्रॅक्टर पेश केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते शेती साठी जे शेतकरी ट्रॅक्टर वर अवलंबून आहेत, त्यांना या ट्रॅक्टर मुळे मोठी बचत करता येणार आहे. शिवाय ७५ टक्के वायू प्रदूषण कमी होणार आहे. शेतकरी दरवर्षी सरासरी ३ ते साडेतीन लाख रुपये इंधनावर खर्च करतो. सीएनजी मुळे हा खर्च एक ते दीड लाखावर येणार आहे. याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल होण्यावर तसेच रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. सीएनजी स्वच्छ इंधन आहे आणि त्यामुळे कार्बन व अन्य प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यास हातभार लावते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *