महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । भारतात आतापर्यंत फक्त ‘कू’ अॅप ने याचे पालन केले आहे. टूलकिट प्रकरणावरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी चांगलीच खडाजंगी उडाली होती. दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी 25 फेब्रुवारी रोजी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या व ते लागू करण्यासाठी संबंधितांना तीन महिन्याचा अवधी दिला होता. परंतु, आज या डेडलाईनला 25 मे रोजी तीन महिने होत आहे. परंतु, आजपर्यंत ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी याला लागू केले नाही आहे.
त्यामुळे केंद्र सरकार संबंधित सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कारण भारतात आतापर्यंत फक्त ‘कू’ अॅप ने याचे पालन केले आहे. त्यामुळे मनमानी करण्याऱ्या ट्विटरसह अनेक सोशल मीडियावर केंद्र सरकार लवकरात लवकर कारवाई करण्याचे संकेत दिसत आहे.
या दरम्यान फेसबुकचे उत्तर आले असून सरकारने जारी केलेल्या आयटीच्या नियमांचे पालन करणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे. त्यासोबतच काही मुद्यांवर सरकारशी बोलणी सुरु राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयटीच्या नियमांनुसार ऑपरेशनल प्रक्रिया लागू करणे आणि फिनिशिंगचे कार्य वाढण्यावर भर असणार आहे. लोक सुरक्षितपणे आपली माहिती या प्लॅटफॉर्मवर शेअर करतील याचादेखील ध्यान ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.