महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । अॅपलने डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2021 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या अॅपल इव्हेंटमध्ये आयफोन 12 मेकर सर्व अॅपल प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन अपडेट्स आणणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार 7 जूनच्या रात्री साडेदहा वाजता सुरू होईल. दर्शक डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2021 कार्यक्रम थेट अधिकृत वेबसाइट किंवा यूट्यूब चॅनेलवर पाहू शकतात. तसेच हा इव्हेंट अॅपल डेव्हलपर अॅप किंवा अॅपल टीव्ही अॅपवरूनही प्रसारित केला जाण्याची शक्यता आहे. (Apple will launch several new products on June 7, know what’s special for you)
डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2021 कार्यक्रमाचा अॅक्सेस अॅपल अभियंता आणि डिझाईनर्सना दिला जाणार आहे, ज्या अभियंता आणि डिझाइनर्सना आधुनिक साधने आणि तंत्रज्ञानाची माहिती आहे. कारण हे अभियंते आणि डिझाइनर्स पुढील पिढीचे अॅप्स तयार करू शकतील. कंपनी पॅव्हिलियन्सची सुरुवात देखील करणार आहे. याच्या मदतीने डेव्हलपर्स त्यांना देण्यात आलेल्या कोणत्याही विषयावर सेशन, लॅब्स किंवा विशेष अॅक्टिव्हीटी करू शकतील.
सॉफ्टवेअर पार्टशिवाय नवीन मॅकबुक प्रो आणि इतर हार्डवेअर उत्पादनेदेखील बाजारात आणली जाऊ शकतात. अलिकडेच ब्लूमबर्ग अहवालात म्हटले आहे की, अॅपल नवीन रिडिझाईन चेसिस आणि नवीन चीपसह एक नवीन मॅकबुक प्रो लॉन्च करू शकेल. अॅपल या इव्हेंटमध्ये एअरपॉड्स 3 आणि एअरपॉड्स 2 यांचाही खुलासा करू शकेल. ब्लूमबर्ग अहवालानुसार, येत्या काही आठवड्यांत एअरपॉड्स 3 लॉन्च केले जाऊ शकते. एअरपॉड्स 3 ची डिझाईन एअरपॉड्स प्रोप्रमाणेच असेल, असे लीक झालेल्या फोटोंवरून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ असा आहे की एअरपॉड्स 3 सध्याच्या जनरेशनपेक्षा थोडासा लहान असेल. यामध्ये अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन मिस होऊ शकते.
अॅपलने आयओएस 14.6 ला रोलराऊट करणे सुरू केले आहे. युजर्सपर्यंत हळूहळू अपडेट्स पाठवले जात आहे. याच अपडेट्सच्या मदतीने कंपनीने युजर्सच्या फोनवर ज्या अडचणी येत आहेत, त्या सर्व अडचणी सोडवण्याचा वादा कंपनीने केला आहे. नवीन अपडेटमध्ये एक पॉडकास्ट सब्सक्रिप्शनसुद्धा मिळेल. पॉडकास्ट क्रिएटर्स अगदी सहजपणे याच्या मदतीने पैसे कमावतील. (Apple will launch several new products on June 7, know what’s special for you)