या फलंदाजांचा न्यूझीलंडविरुद्ध दबदबा, कसोटीमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे फलंदाज,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । सध्या भारतीय संघात असणाऱ्या ऋषभ पंत (Rishabh Pant), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), शुभमन गिल(Shubhman Gill), हनुमा विहारी (Hanuma Vihari)या महत्त्वाच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या राहुल द्रविड़ने (Rahul Dravid) न्यूझीलंड विरोधात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 1997 पासून 15 कसोटी सामन्यात 63.80 च्या सरासरीने 1 हजार 659 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजेत्याने एकाच सामन्यातील दोन डावांत शतकं ठोकली आहेत.

द्रविडनंतर नंबर लागतो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar). सचिनने किवींजविरोधात 24 कसोटी सामन्यांत 1 हजार 595 धावा केल्या आहेत.सचिनने देखील एकाच सामन्यांतील दोन डावांत शतकं ठोकली आहेत

त्यानंतर न्यूझीलंडविरोधात सर्वाधिक धावां करणाऱ्यांत तिसऱ्या स्थानी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) विराजमान आहे. त्याने 2002 सालापासून 12 कसोटीसामन्यांत 44.15 च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) देखील न्यूझीलंडच्या गोलदाजांना सळो की पळो केलं होतं. लक्ष्मणने 10 सामन्यांत 58.42 च्या सरासरीने 818 धावा ठोकल्या आहेत.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसारखा महत्त्वाचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. त्यामुळे माजी खेळाडूंप्रमाणे सध्याचे युवा फलंदाज ही धडाकेबाज कामगिरी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *