‘उज्ज्वल निकम’ जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अजमल कसाबला फासापर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम  यांच्या जीवनावर आधारित बॉलिवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असं असेल, अशी माहिती आहे. 

‘निकम’  नावाच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट अशा एका व्यक्तीची कथा आहे, ज्याने मुंबईमधील 1993 मधला साखळी बॉम्बस्फोट, 26/11 दहशतवादी हल्ला, गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि भाजपा नेते प्रमोद महाजन हत्या प्रकरणांसारखी हाय प्रोफाइल केसेससाठी त्यांनी लढल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला या चित्रपटाची पटकथा लिहणार आहेत. दरम्यान, ‘मला गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या जीवनावर आधारित पुस्तक लिहण्यास किंवा चित्रपटाच्या निर्मितीसाठी विचारणा केली जात होती. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. परंतु, यामधून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी कथा सांगितली जाईल, त्यामुळे मी सहमती दर्शवली’ अशी भावना यावेळी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली. दिग्दर्शक उमेश शुक्लाही या चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अतिशय उत्सुक असून ‘निकम’ चित्रपटाची निर्मिती शुक्ला, सेजल शाह, आशीष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडालिया करणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *