महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांनंतर देशात इंधनाची दरवाढ कायम आहे. दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. देशातील तेल कंपन्यांनी नुकतंच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर शुक्रवारी मात्र त्यात कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today 28 May 2021)
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमधील काल पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ झाली होती. आज मात्र हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.
शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
अहमदनगर₹ 99.37 ₹ 89.85
अमरावती ₹ 100.49 ₹ 90.94
औरंगाबाद ₹ 100.95 ₹ 92.81
भंडारा ₹ 100.22 ₹ 90.69
बुलडाणा ₹ 100.29 ₹ 90.75
चंद्रपूर ₹ 99.97 ₹ 90.45
धुळे ₹ 99.61 ₹ 90.08
गडचिरोली ₹ 101.59 ₹ 92.01
गोंदिया ₹ 100.94 ₹ 91.37
हिंगोली ₹ 100.69 ₹ 91.14
जळगाव ₹ 100.86 ₹ 91.28
जालना ₹ 100.98 ₹ 91.39
कोल्हापूर ₹ 99.94 ₹ 90.41
लातूर ₹ 101.22 ₹ 91.64
मुंबई शहर ₹ 99.71 ₹ 91.57
नागपूर ₹ 99.70 ₹ 90.19
नांदेड ₹ 101.47 ₹ 91.88
नंदूरबार ₹ 100.45 ₹ 90.89
नाशिक ₹ 99.89 ₹ 90.34
उस्मानाबाद ₹ 100.15 ₹ 90.61
पालघर ₹ 99.98 ₹ 90.40
परभणी ₹ 102.03 ₹ 92.40
पुणे ₹ 99.49 ₹ 89.95
रायगड ₹ 99.36 ₹ 89.80
रत्नागिरी ₹ 100.53 ₹ 90.93
सांगली ₹ 99.88 ₹ 90.36
सातारा ₹ 100.12 ₹ 90.58
सिंधुदुर्ग ₹ 101.20 ₹ 91.63
सोलापूर ₹ 100.10 ₹ 90.56
ठाणे ₹ 99.44 ₹ 89.88
वर्धा ₹ 100 ₹ 90.47
वाशिम ₹ 100.34 ₹ 90.80