1 जूनपासून होणार हे 5 मोठे बदल, याचा तुमच्यावरही होणार थेट परीणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । एक जूनपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परीणाम तुमच्या पॉकेट आणि आयुष्यावर होईल. यासाठी तुमच्याकडे नियमांची माहिती पहिल्यापासूनच ठेवणे आवश्यक आहे. 1 जूनपासून बँक ऑफ बडोदामध्ये चेकने पेमेंट करण्याची पध्दत बदलणार आहे. आम्ही तुम्हाला अशा 5 बदलांविषयी सांगणार आहोत ज्याचा थेट तुमच्यावर परीणाम होईल.

बँक ऑफ बडोदामध्ये 1 जूनपासून चेकने पेमेंटची पध्दत बदणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी बँकेच्या ग्राहकांसाठी पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य असणार आहे. ही सिस्टम लागू करण्याचा हेतू चेकच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखणे हा आहे. ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेकच्या डिटेल्स तेव्हाच रिकन्फर्म कराव्या लागतील, जेव्हा ते 2 लाख रुपये किंवा यापेक्षा जास्तचे बँक चेक जारी करतील.

पॉझिटिव्ह पे प्रणालीअंतर्गत धनादेश जारी करणार्‍यास त्या धनादेशाशी संबंधित माहिती भरणा बँकेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्यावी लागेल. एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे ही माहिती दिली जाऊ शकते.

राज्य सरकारच्या तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवत असतात. किंमतींमध्ये वाढही होऊ शकते आणि दिलासाही मिळू शकतो. अशा वेळी जूनला सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदलही होऊ शकतो.

गूग फोटोजमध्ये 1 जूननंतर अनलिमिटेड फोटोज अपलोड करता येणार नाही. गूगलनुसार 15GB चा स्पेस प्रत्येक जीमेल यूजर्सला दिला जाईल. या स्पेसमध्ये जीमलेच्या ईमेलचाही समावेश आहे आणि यासोबतच तुमच्या फोटोजचाही समावेश आहे. यामध्ये गूगल ड्राइव्हचाही समावेश आहे. जर 15GB पेक्षा जास्त स्पेस वापरायचा असेल तर यासाठी पैसे द्यावे लागतील. आतापर्यंत अनलिमिटेड स्टोरेज फ्री होते.

1 ते 6 जूनपर्यंत इनकम टॅक्स डिपार्टमेंचे ई-फाइलिंग पोर्टल काम करणारर नाही. तर 7 जूनला इनकम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्सपेयर्ससाठी इनकम टॅक्स ई-फायलिंगचे नवीन पोर्टल लॉन्च करेल. आयर निर्देशालयानुसार ITR भरण्याच्या जास्तीत जास्त वेबसाइट 7 जून 2021 पासून बदलतील. 7 जूनपासून हे http://INCOMETAX.GOV.IN होऊन जाईल. सध्या हे http://incometaxindiaefiling.gov.in आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *