औरंगाबाद-पुणे 100 इलेक्ट्रिक बस धावणार -एसटी महामंडळाची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ ,पुणे – औरंगाबाद-पुणे 100 इलेक्ट्रिक बस धावणार, बसची संख्या दुप्पट केली जाणार आहे. एसटी महामंडळाने शुक्रवारी केलेल्या घोषणेनुसार, यात 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक बस जोडल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या या मार्गावर 50 सामान्य बस आणि तेवढ्याच संख्येने एसी आणि इतर बस चालवल्या जातात. त्यामध्येच 100 इलेक्ट्रिक बस वाढवल्या जात आहेत.

औरंगाबाद आणि पुण्यात चार्जिंग पॉइंट अरुण सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून दररोज 5 हजार लिटर डीझेल वापरले जाते. इलेक्ट्रिक बस आल्यास इंधनाची बचत करण्यास मदत होईल.” या विशेष बससाठी औरंगाबाद आणि पुणे या ठिकाणी चार्जिंग पॉइंट ठेवले जाणार आहेत. या चार्जिंग पॉइंटवर एकाचवेळी 8 बस चार्ज केल्या जाऊ शकतील. सिया यांनी सांगितल्याप्रमाणे, या सर्वच बस खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. तसेच चार्जिंग पॉइंटवर एका महिन्यात काम सुरू केले जाईल.

एकदा चार्ज झाल्यास 400 किमी धावणार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही शहरांमध्ये एका-एकावेळी 8 बस एकदाच चार्ज होतील. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील. तसेच एकदा चार्जिंग झाल्यास या बस सलग 400 किमी अंतरापर्यंत धावू शकतील. या सर्वच बस पुढच्या 6 महिन्यांच्या आत औरंगाबाद-पुणे आणि पुणे-औरंगाबाद मार्गावर धावताना दिसतील असा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *