महाराष्ट्र २४- यंदाच्या आर्थिक वर्षात महसुली तूट वाढेल, असा अंदाज अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला होता. यासाठी मोदी सरकारला रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षा होती. आरबीआय नोटा छापून महसुली तूट कमी करण्यास मदत करेल, अशी आशा सरकारला होती. मात्र नोटा छापण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
यंदा महसुली तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.८ टक्के राहील, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महसुली तूट ३.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. आरबीआय महसुली तूट कमी करण्यासाठी मदत करेल, अशी सरकारला अपेक्षा होती. मात्र नोटा छापण्याची कोणतीही योजना नसल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे.