‘आयपीएल’चा निर्णय आज ; ‘बीसीसीआय’ची आज बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यानच्या तीन आठवडय़ांत खेळवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शनिवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दूरचित्रसंवादाद्वारे शनिवारी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या विशेष सर्वसाधारण सभेत ‘आयपीएल’सह आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगाम आणि रणजीपटूंची नुकसानभरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे.

‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली शनिवारी मुंबईतून या बैठकीचे नेतृत्व करील. ‘आयपीएल’चे अमिरातीमधील अबू धाबी, दुबई आणि शारजा या शहरांत आयोजन करता येईल. १८ किंवा २० सप्टेंबरला स्पध्रेला प्रारंभ करून १० ऑक्टोबरला ती संपवण्याची योजना आहे. चार बाद फेरीच्या सामन्यांशिवाय १० दुहेरी आणि सात एकेरी सामने प्रत्येक दिवशी आयोजित करण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *