फ्लाईन्ग शीख मिल्खा सिंग यांची 91 व्या वर्षां कोरोना वर मात , पत्नीची झुंज अद्याप सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यांना रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांना आयसीयूमध्ये (ICU) शिफ्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची चिंता अजूनही कायम आहे.

मिल्खा सिंग यांना सोमवारी मोहालीच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरनोची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधील उपचारानंतर मिल्खा यांची तब्येत सुधारली. मात्र निर्मल यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनमध्ये शनिवारी वाढ झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या विनंतीवरुन त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीवा मिल्खा सिंग दुबईहून चंदीगडमध्ये आला आहे. तसेच अमेरिकेत डॉक्टर असलेली त्यांची मुलगी मोना या देखील काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये आल्या आहेत. मिल्खा सिंग यांना घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे.

मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते. त्यांच्या पत्नी निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलीबॉल टीमच्या माजी कॅप्टन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *