महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । सोन्या चांदीच्या खरेदीला काहीसा ब्रेक लागला असता तरीही लग्नघरांमध्ये मात्र काही प्रमाणात दागदागिन्यांची खरेदी सुरु आहे. अर्थात या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे ही बाब मात्र नाकारता येणार नाही. सध्या सराफा बाजारांमध्ये कमालीची शांतता आहे. याला कारण ठरत आहे सोनं- चांदीच्या दरांमध्ये असणारी अस्थितरता. काही किरकोळ प्रमाणात सोन्याच्या दरात होणारी घट आणि लगेचच वाढणारे दर यामुळं खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पटलावर घडणाऱ्या घटनांचेही या दरांवर परिणाम होत आहेत. ‘गुड रिटर्न्स’च्या वेबसाईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबईत आजच्या दिवशी, 22 कॅरेट प्रती तोळ्यासाठी सोन्याच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, दिल्लीमध्ये हे दर 46770 रुपये प्रती तोळा (22 कॅरेट) इतके आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर किती?
मुंबई – 46600
दिल्ली – 46770
बंगळुरू – 45820
चंदीगढ- 46770
कोलकाता – 48180
नाशिक- 46,600
सोमवारी देशात चांदीच्या दरात फारसा फरक दिसून आला नाही. रविवारप्रमाणेच आजही चांदीचे दर किलो चांदीसाठी 71600 रुपये मोजावे लागणार आहेत.