वेंगसरकरांनी केली भविष्यवाणी ; WTC Final जिकंण्याची कोणाला संधी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. या मॅचआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध (New Zealand vs England) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळेल, या सीरिजचा न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होईल, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी केली. क्रिकेटनेक्स्टसोबत दिलीप वेंगसरकर बोलत होते.

‘टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी हा मोठा मोसम आहे. बायो-बबलमध्ये राहणं कठीण आहे, पण टीम इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली. इंग्लंडमधली सीरिज रंजक होईल. तिथल्या परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. तिकडे खेळपट्टीवर जास्त काळ घालवणं गरजेचं आहे. आम्हाला हा फायदा मिळायचा, कारण आम्ही सीरिजच्या आधी आणि सीरिजच्या मध्ये काऊंटी क्रिकेट खेळायचो, त्यामुळे परिस्थितीनुसार बदलण्याची आम्हाला संधी मिळायची,’ असं वेंगसरकर म्हणाले.

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्याआधी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. फायनल त्यांच्यासाठी इंग्लंडमधली तिसरी टेस्ट असेल, तर आपली पहिलीच असेल, याचा न्यूझीलंडला फायदा होईल, पण भारताकडे चांगली बॅटिंग आहे, त्यांनी जर स्वत:च्या क्षमतेनुसार खेळ केला, तर टीमची कामगिरी नक्कीच चांगली होईल,’ असं वेंगसरकरांना वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *