महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे । कमॉडिटी बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या तीन सत्रातील नफावसुलीला ब्रेक लागला असून आज सोने २८० रुपयांनी तर ५०० रुपयांनी महागली आहे.नफेखोरीने गेल्या आठवड्यात सोने दरात ६८० रुपयांनी तर चांदीमध्ये १४०० रुपयांची घसरण झाली होती. कमॉडिटी बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ४९१५५ रुपयांवर स्थिरावला. तर चांदीचा भाव ७१५३० रुपयांवर बंद झाला.
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९३३१ रुपये झाला आहे. त्यात सध्या १८८ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोने ४९४३९ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेले होते. एक किलो चांदीचा भाव ७१८७४ रुपये आहे. त्यात २६३ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने ७२१४४ रुपयांचा स्तर गाठला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७०० रुपये इतका झाला. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७७०० रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०८७० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६२८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०४८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०८६० रुपये आहे.