राशीभविष्य :या राशीवर असेल बजरंगबली चा आशीर्वाद ; पहा आजचे भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून ।

मेष- आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते.

वृषभ- आज दिवस चांगला आहे. दूरच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद घडण्याचा योग आहे. कुटुंबाची साथ मिळेल. तुमच्या वाणीवर मात्र ताबा ठेवा.

मिथुन- आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. विचार मात्र सकारात्मक ठेवा. तुमच्या आवडीची कामं करण्यासाठी उत्सुक असाल. आरोग्याशी संबंधित अल्प चढ-उतार असतील. फक्त घरगुती उपायांनीच तुम्हाला निरोगी आणि ऊर्जावान वाटेल.

कर्क- आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित कोणतीही सकारात्मक गोष्ट लोकांसमोर येईल आणि तुमची प्रशंसा होईल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकीही कायम राहील.तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर असेल. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी आहे. काही सकारात्मक बदल घडतील.

सिंह- वेळ तुमच्या कलानं आहे. समाजिक स्तर उंचावेल. तुमच्या म्हणण्याला प्राधान्य देण्यात येईल. न्यायालयीन कामं मार्गी लागतील. जास्त कामाचा ताण आरोग्यावरही परिणाम करेल. आपल्या विश्रांतीसाठी थोडा वेळ काढणे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे देखील आवश्यक आहे.

कन्या- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल. सध्याच्या वातावरणामुळे आपल्याला संक्रमण आणि ताप सारख्या काही समस्या उद्भवू शकतात. अधिक आयुर्वेदिक गोष्टी वापरा.

तुळ- समोर येणाऱ्या प्रत्येक संधीलर लक्ष ठेवा. तुमची कामं अडणार नाहीत. एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरु होईल. इतरांच्या गरजाही लक्षात घ्या.जास्त ताण घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या ब्लड प्रेशरची समस्या वाढवू शकतो. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक – कोणा एका नव्या स्थानावर भेट देण्यासाठी जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधार येतील. आर्थिक कारणास्तव एखादा प्रवास करावा लागू शकतो. चिडचिडेपणा आणि तणाव आपल्या आरोग्यावर परिणाम करु शकतो. ज्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या देखील होईल.

धनु- आर्थिक स्थितीचा विचार करा. तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल. काही अडथळे दूर होतील. कुटुंबात एकी राहील. गुडघे आणि सांध्याची समस्या वाढू शकते. यावेळी महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मकर- जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष द्या. व्यापार आणि नोकरीवर लक्ष द्या. पुढे जाण्याच्या संधी आहेत. मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळेल. अनियमित आहार आणि नित्यकर्मांमुळे यकृत आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.

कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.कोणत्याही चिंतेमुळे झोप न येण्यासारख्या समस्या उद्भवतील. ज्यामुळे शारीरिक थकवा देखील वाढेल. ध्यान आणि योगा करा.

मीन- कुटुंब आणि मित्रपरिवाराची साथ मिळाल्यामुळं अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. अधिकाधिक गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. जर आपल्याला खोकला, सर्दीसारखी समस्या असेल तर निष्काळजीपणाने वागू नका. आणि त्वरित योग्य उपचार मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *