महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । महाराष्ट्रात मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण आवश्यक आहे नाहीतर तरूण वर्गात भेदाभेद ची भावना पसरून समाजा समाजा मध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकते…..कारण खूप वर्षापूर्वी मराठा समाजाची परिस्थिती वेगळी होती… गावागावात पाटीलकी ही होती…तेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाच्या भूमिकेला विरोध होता. कारण तेव्हा प्रत्येकाच्या वाट्याला शेतीचे प्रमाण बऱ्यापैकी होते….शिवाय गावागावाचे कारभारी म्हणून कारभार पाहत असतांना ओघाने त्यांचे राहणीमान हे पहील्या पासूनच रुबाबदार होते जे आजही कायम आहे…. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सुदृढ समाज व रुबाबदार दार राहणीमानामुळे आर्थिक मागासलेपण दिसून येत नव्हते परीणामी सदर समाज मागासलेला नाही असा निष्कर्ष वेळोवेळी लागत आला आहे……परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे…. मराठा समाजात जवळपास 80 ते 85 % समाजाला आरक्षणाची आवश्यकता भासू लागली आहे….. 15__20 % समाज आर्थिक…सामाजिक दृष्ट्या सुदृढ आहे…बरेच वर्ष राजकीय सत्तेत ते आहेत असे असले तरी आजच्या घडीला उर्वरित समाजातील तरूण वर्ग भरकटू नये म्हणून किमान शैक्षणिक व नोकरीत आरक्षण आवश्यक आहे जेणेकरून करून समाजात भेदाभेद निर्माण होणार नाही.
अशा योग्य वेळेला मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे पाउल उचलले आहे ते अतीशय धाडसी आहे…कारण ” मि सर्वप्रथम एखाद्या समाजाचा नेता आहे तदनंतर राजकीय पक्षाचा नेता आहे ” असे म्हणायला खूप मोठे धाडस लागते कारण तसे म्हटल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागू शकते…….परंतू खासदार राजेसंभाजींनी राजकीय अस्तित्वाची फिकर न करता सर्व प्रथम मराठा समाजाचा नेता आहे अशी ग्वाही देवून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना प्रत्यक्षात भेटून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठींबा देऊन सहकार्य करावे अशी नम्रतापुर्वक मागणी करीत आहेत….. सूभाजी राजेंची हि भूमीका आजच्या घडीला अतीशय योग्य अशीआहे ज्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो……सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटण्याच्या भूमीके मुळे सामाजिक सलोखा तर तयार होईलच परंतू त्याच बरोबर केंद्र सरकारवरही दबाव वाढू शकतो जेणेकरुन सदर प्रश्नी केंद्र सरकार लक्ष घालेल व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन….. कारण संभाजीराजे हे केंद्रीय सत्ताधारी पक्षाचे विद्यमान खासदारही आहेत…..पि.के.महाजन.