महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । गेल्या आठवड्यातच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट ‘शेरनी’चा पोस्टर आऊट केला होता. जवळजवळ एक वर्षानंतर विद्याला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा टिजर रिलीज करून २ जूनला ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली.
न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर अॅमेझॉन प्राइमवर होणार आहे. शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे जी आपल्याला मानव-पशु संघर्षाच्या जगात संतुलनासाठी प्रयत्न करणाऱ्या वनअधिकाऱ्याच्या प्रवासात घेऊन जाते.
A tigress always knows the way!
Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser.
Trailer out, June 2.
Meet #SherniOnPrime, June 2021. @PrimeVideoIN @tseriesfilms@TSeries@Abundantia_Ent@vikramix@ShikhaaSharma03@AasthaTiku
#AmitMasurkar #BhushanKumar pic.twitter.com/Fre6hE5RwE— vidya balan (@vidya_balan) May 31, 2021
भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मलहोत्रा आणि अमित मसुरकर निर्मित या चित्रपटामध्ये शरत सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी यांचा समावेश आहे. शेरनी जूनमध्ये प्रदर्शित होईल.