टी20 वर्ल्डकपचं आयोजन दर दोन वर्षांनी; 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत 14 संघांचा सहभाग, ; ICC ची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा पुढील आठ वर्षाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, आता टी20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी खेळवला जाणार आहे. तर 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये 2027 मध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. आयसीसीनं मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे चार हंगाम आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील फेरीत खेळवल्या जातील, अशी माहितीही आयसीसीच्या वतीनं देण्यात आली आहे.

आयसीसीनं बैठकीनंतर सांगितलं की, “आयसीसी बोर्डाने आज 2024 ते 2031 या कालावधीचे वेळापत्रक निश्चित केले. ज्यामध्ये पुरुष क्रिकेट वर्ल्डकप आणि टी-20 वर्ल्डकप खेळवण्यात येईल आणि चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा आयोजित करण्यात येईल.”

आयसीसीनं सांगितलं की, “पुरुषांच्या वर्ल्डकपमध्ये 2027 आणि 2031 मध्ये 14 संघ सहभागी होती. तर टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होतील. तर 2024, 2026, 2028 आणि 2030 मध्ये 55 सामने खेळवले जातील.” सध्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपची स्पर्धा दहा संघांमध्ये खेळवली जाते.

टी20 वर्ल्डकपमध्ये 16 संघ

“यंदा टी20 वर्ल्डकपमध्ये 16 संघांमध्ये सामने खेळवले जातील. आठ संघांमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि 2029 मध्ये खेळवण्यात येणार आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामने 2025, 2027, 2029 आणि 2031 मध्ये खेळवले जातील. आयसीसी महिला स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आलं आहे.”, अशी माहिती आयसीसीनं दिली.

पुरुषांच्या वर्ल्डकपमध्ये सात संघांचे दोन गट असतील आणि दोन्ही गटांतील पहिले तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. 2003 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्येही हेच स्वरूप होते. टी-20 वर्ल्डकपमध्ये पाच गटांचे चार गट असतील. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.

आयसीसी बोर्डाने पुढील फेरीतील सर्व पुरुष, महिला आणि अंडर -19 स्पर्धेचे यजमान निश्चित करण्याच्या प्रक्रियेस मान्यताही दिली. सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या स्पर्धेचं आयोजन कोण करणार याची निवड केली जाईल. तर महिलांच्या स्पर्धेचं आणि टी20 स्पर्धेचं आयोजन कोण करणार यासंदर्भातील निर्णय नोव्हेंबरमध्ये ठरवलं जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *