Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पीएफ काढण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या - Maharashtra 24

पीएफ काढण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । पेंशनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने दिलासा मिळाला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयानुसार त्यांच्या पूर्ण पगाराच्या हिशेबाने पेन्शन मिळणार आहे. अशात ईपीएफ म्हणजेच एम्प्लाॅइड प्राॅव्हिडंट फंड नोकरदारांसाठी महत्त्वाचा आहे. हा एका निवृत्ती वेतन प्लॅनप्रमाणे असून बऱ्याच अवधीनंतर याच्यातील गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे.नोकरी बदलताना अगोदर लोक फंड ट्रान्सफर करायचे. पण ईपीएफओ काढून घेणाऱ्यांची संख्या गेली काही वर्षात वाढली असल्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे.

यासाठी तुम्हाला ई सेवा पोर्टल https:unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लाॅग इन करावे लागेल. लाॅगइन केल्यानंतर तुम्हाला आधार बेस्ड आॅनलाइन क्लेम सबमिशन टॅब निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला केवायसी डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. क्लेमसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा आॅप्शन निवडावा लागेल. ईपीएफओतर्फे तुम्हाला युआयडीएआय डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड मोबाइलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यानंतर क्लेम फाॅर्म सादर होईल आणि तुमचा पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. सगळी प्रक्रिया संपली की रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

आॅनलाइन सेवेचा वापर करण्यासाठी ईपीएफओ प्रतिनिधीला मालकाकडे जायची गरज नाही. पण तुमच्याकडे कंपनीचा इस्टॅब्लिशमेंट नंबर हवा. तुमचा रजिस्टर्ड नंबर आणि ईपीएफओमधला मोबाइल नंबर एकच हवा. ईपीएफओ खातेधारकांसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देईल. जोपर्यंत तुम्ही पीएफमधील पैसे काढून घेत नाहीत तोपर्यंत तो नंबर निष्क्रिय होणार नाही. या नंबर अॅक्टिव्हेट होणे गरजेचे आहे. प्रतिनिधीचा मोबाइल नंबर युएएन डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड व्हायला हवा. आधार कार्डाची माहितीही ईपीएफओच्या वेबसाइटवर हवी. बँकेची माहितीही युएएनमध्ये हवी. तसेच पॅनही ईपीएफओच्या डेटाबेसमध्ये हवे. तुमचे आधार कार्ड ईपीएफओला लिंक असेल तर पूर्ण प्रक्रिया 3 ते 4 दिवसात होईल. ईपीएफओ याहूनही प्रक्रिया लवकर होईल याची तयारी करत आहे. मग पैसे लगेच मिळतील. पण पीएफ अकाऊंटची केवायसी आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *