हायकोर्टाच्या केंद्र व राज्य सरकारला सूचना ; म्युकरमायकोसिसच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नका !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । कोविडपाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून नगर जिह्यात गेल्या तीन दिवसांत 9928 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबत चिंता व्यक्त करत मुख्य न्यायमूर्तींनी केंद्र सरकार व राज्य सरकारला म्युकरमायकोसिसच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नका असे बजावले. तसेच यासंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.

कोविडसंदर्भातील विविध समस्यांवर हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. राजेश इनामदार यांनी म्युकरमायकोसिस या आजाराबाबत खंडपीठाला माहिती दिली. त्यांनी कोर्टाला सांगितले की, कोविडचा धोका टळत असला तरी म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्याचबरोबर ‘एसपरजिलस’ हा बुरशीजन्य आजारही हळूहळू पसरत आहे. तसेच मे महिन्यात लहान मुलांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून राज्य सरकार केवळ टास्क फोर्स बनवण्याव्यतिरिक्त काहीच करत नाही. एवढेच काय तर म्युकरमायकोसिसवर दिवसाला औषधांचे सहा डोस देणे गरजेचे असताना पुण्यात रुग्णांना केवळ एकच डोस दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी कोर्टाला सांगितले की, म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला ‘अॅम्पोथेरेसिल बी’ या इंजेक्शनच्या 4 ते 5 कुप्या लागतात. पेंद्राकडून ही इंजेक्शन मिळत असून केंद्राकडेही सध्या औषधांचा तुटवडा आहे. या औषधनिर्मितीसाठी राज्यातील हाफकिन इन्स्टिटय़ूट काम करत असून 6 जूनपर्यंत राज्याला जवळपास 40 हजार इंजेक्शन मिळतील.

दरम्यान, अमेरिकेत म्युकरमायकोसिसची काय परिस्थिती आहे? असा सवाल हायकोर्टाने विचारला. तेव्हा हा रोग साथीच्या रोगाप्रमाणे पसरणारा नाही, विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्यांना हा आजार होतो, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *