बुलेट ट्रेन, बोइंग विमानापेक्षाही वेगवान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने आमच्या जीवनाला अनेक पातळय़ांवर प्रभावित केले आहे. पण अद्याप प्रवासाची पद्धत बहुतांश अत्यंत पारंपरिकच राहिली आहे. मागील काही काळापासून एका तंत्रज्ञानाची प्रचंड चर्चा सुरू असून ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता बाळगणारे आहे. या तंत्रज्ञानाचे नाव आहे हायपरलूप. हे चुंबकीय कॅप्सूल असून जे जमिनीच्या काही उंचीवर 1223 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने हवेत तरंगणार आहे. जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन जपानी शिंकासेन ट्रेनपेक्षाही हे तंत्रज्ञान 3.5 पट अधिक वेगवान असणार आहे. याचबरोबर हे हायपरलूप बोइंग 747 विमानापेक्षाही अधिक जलदगतीने प्रवास घडविणार आहे.

व्हर्जिन हायपरलूप आणि हायपरलूप टीटी या दोन कंपन्या ही कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी काम करत आहेत. व्हर्जिन हायपरलूपने प्रवाशांसोबत परीक्षणही केले आहे. 2020 च्या अखेरीस या कंपनीने लास वेगास आणि नेवादा या शहरांदरमन यशस्वी परीक्षण केले होते.

या फ्युचरिस्टिक तंत्रज्ञानाचा उद्देश दोन शहरांमधील प्रवास अधिक जलद करणे आहे. या तंत्रज्ञानात विमानाच्या तुलनेत कमी प्रदूषण होणार आहे. याचबरोबर प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला बळ मिळण्याची शक्यता आहे. पण या प्रकल्पातील आर्थिक खर्च आणि पर्यावरणाचा मुद्दा मोठी आव्हाने आहेत.

हायपरलूप पारंपरिक रेल्वेपेक्षा दोन गोष्टींमध्ये खूपच वेगळी आहे. हे पॉड्स अंडरग्राउंड टय़ूबमधून धावणार आहेत आणि या टय़ूबमधून बहुतांश हवा बाहेर काढण्यात येणार आहे. याचमुळे हे पॉड्स 750 मैल प्रतितास म्हणजेच सुमारे 1223 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहेत. याचबरोबर रेल्वे किंवा कारप्रमाणे चाकांवर धावण्याऐवजी हे पॉड्स जमिनीच्या किंचित वर हवेत तरंगतील किंवा घर्षण कमी करण्यासाठी या पॉड्समध्ये मॅग्नेटिक लेविटेशनचा वापर करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक लेविटेशन तंत्रज्ञान हायपरलूपच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

व्हर्जिन हायपरलूप भारतात स्वतःचे प्रवासी मार्ग तयार करण्यासंबंधी विचार करत आहे. भारतात वाहतूक व्यवस्था अत्यंत गर्दीयुक्त आहे. याचबरेबर अशाप्रकारचे प्रवासी मार्ग सौदी अरेबियात तयार करण्याची तयारी आहे. या तंत्रज्ञानामुळे लंडन ते पॅरिस हे अंतर केवळ अर्ध्या तासात आणि लॉस एंजिलिस ते सॅन फ्रान्सिस्को केवळ 45 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. हे तंत्रज्ञान पुढील काही वर्षांमध्ये जगात अनेक ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *