Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पाटणा एम्समध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु - Maharashtra 24

पाटणा एम्समध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पावले उचलायला सुरवात केली आहे. लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक ठरू शकते. तसेच मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण देखील अधिक असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार २ ते १८ वयोगटातील मुलांवर देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीसाठी मुलांचे वय किमान २ वर्षे असायला हवे असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.

पाटण्यातील एम्समध्ये २ जूनला तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुले आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुले चाचणी करण्यासाठी योग्य असल्यामुळे त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला.

या मुलांना लस दिल्यानंतर जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. या मुलांना आता २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *