Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Silver Price : सोन्याचा भाव 'स्थिर ' तर चांदीच्या भावात किरकोळ वाढ - Maharashtra 24

Gold Silver Price : सोन्याचा भाव ‘स्थिर ‘ तर चांदीच्या भावात किरकोळ वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । गुरुवारी बाजार बंद होताना सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही तर चांदीच्या भावात किरकोळ म्हणजे 100 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 48,230 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 49,230 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,000 रुपये इतका आहे.

बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. त्या आधी मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याच्या भावात अचानक 1330 रुपयांची वाढ झाली होती आणि ते 49,230 रुपयांवर पहोचलं. 31 मे रोजी 110 रुपयांची आणि 1 जून रोजी 200 रुपये वाढ झाली होती. 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. 26 मेला अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला. 27 तारखेला पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर 28 मे रोजी 110 रुपयांची घट, 29 मे रोजी 90 रुपयांची वाढ, 30 मे रोजी 10 तर 30 मे रोजी 110 रुपयांची वाढ झाली.

आज चांदीच्या भावात 100 रुपयांची वाढ होऊन तो 72,000 इतका झाला आहे. त्या आधी बुधवारी चांदीच्या किंमतीत 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. 1 जून रोजी 600 रुपयांची वाढ तर 31 मे रोजी 400 रुपयांची वाढ झालेली दिसून येतंय. सोन्याच्या तुलनेत चांदीचा भाव हा सातत्याने वाढताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *