आता डिझेलची शतका कडे वाटचाल, महागाई पासून सुटका नाहीच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । Petrol Price Today 04 June 2021: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. केवळ या वर्षाबद्दल बोललो तर आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता पेट्रोलच्या किमतीनंतर डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. नव्या वर्षात डिझेल 12 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे महागाईत पेट्रोल-डिझेलचा अधिक भडका उडणार आहे.

सलग दोन दिवस कोणतीही दरवाढ न होता आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल 26-27 पैसे प्रति लिटर महागले आहे, तर डिझेलच्या दरात 26-30 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल डॉलर 71 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत आहे, त्यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये उपलब्ध आहे, तिथे पेट्रोलचा दर 105.80 रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर 98.63 रुपये आहे. जर किंमत अशाच प्रकारे वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत डिझेल देखील येथे प्रति लिटर 100 रुपये होईल. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 101 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे, तर डिझेलची किंमत 93 रुपयांवर आहे.

4 मेट्रो शरातील Petrol ची किंमत
शहर कालचा दर आजचा दर
दिल्ली 94.49 94.76
मुंबई 100.72 100.98
कोलकाता 94.50 94.76
चेन्नई 95.99 96.23

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *