भारताचे माजी धावपटू ; Flying Sikh मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जून । भारताचे माजी धावपटू आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित Flying Sikh मिल्खा सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पीजीआय चंडीगड (PGI Chandigarh) रुग्णालातील डॉक्टरांनी दिलीये. पीजीआय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जगत राम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मिल्खा सिंग यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिलीये. 91 वर्षीय मिल्खा सिंग तीन सदस्यीय डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन लेव्हल स्थिर असून ते अजूनही आयसीयूत असल्याची माहिती जगतराम यांनी दिली आहे.

17 मे रोजी मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 31 मे रोजी त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते आपल्या घरी प्रोटोकॉलच्या नियमावलीचे पालन करत होते. 3 जून रोजी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीजीआय रुग्णालय प्रशासनाचे प्रवक्ता अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्खा सिंग यांची ऑक्सीजन लेव्हल ठिक असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *