राशीभविष्य, ; आज या राशीच्या लोकांना चांगल्या वार्ता मिळतील धन लाभाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून ।

मेष – आजचा दिवस आनंदी आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता.

वृषभ – आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील.  कामे अपूर्ण राहतील.

मिथुन – आज विविध मार्गांनी लाभ होईल . पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल.

कर्क – आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता. कुटुंबात महत्त्वाच्या विषायवर चर्चा होईल. 

सिंह – आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल.

कन्या – आज बोलण्यावर ताबा ठेवा आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात.

तूळ – आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत.

वृश्चिक – आज कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. कचेरीत सहकार्य चांगले मिळेल.

धनु – आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर – आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता असेल . घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. त्यामुळे मनात बेचैनी वाढेल.

कुंभ – आज चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल . मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.

मीन – आज तोंडावर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील . खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *