Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच लागणार, संबंधित आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध होणार - Maharashtra 24

दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच लागणार, संबंधित आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.

दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
– दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *