महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील 6 राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल 28 पैशांनी महाग होऊन 95.31 आणि डिझेल 27 पैशांनी वाढून 86.22 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 1 रुपया 8 पैसे आणि डिझेल 1 रुपया 7 पैसे महाग झाले आहे.
6 राज्यामध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे
देशातील 6 राज्यात पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर तेलंगणा आणि लडाखमध्ये बर्याच ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.