Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार - Maharashtra 24

आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाध साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित ( pm modi to address the nation ) करणार आहेत, एएनआयने हे वृत्त दिलं आहे. पंतप्रधान मोदींकडून या संबोधनात लसीकरण मोहीमेवर अधिक भर देण्याची शक्यता आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत ( coronavirus india ) आहे. गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांची संख्या देशात १ लाख ६३६ इतकी आढळून आली आहे. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांची म्हणजेच उपचार घेणाऱ्यांची संख्याही १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे. तर लसीकरण मोहीमेत आतापर्यंत २३ कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह अनेक राज्यांमध्ये आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध आणि नियमांसह अनलॉक सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्ली मॉल, बाजार, शॉपिंग कॉम्प्लेक्स सम-विषम नियमानुसार सुरू करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रोही आजपासून सुरू करण्यात आली आहे. तर अजूनही काही राज्यांमध्ये कर्नाटक, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोव्यात लॉकडाउन किंवा कडक निर्बंध कायम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *