Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
अहमदनगर जिल्ह्यातील व्यवसायांना परवानगी, शिर्डीतील साई मंदिर मात्र बंदच - Maharashtra 24

अहमदनगर जिल्ह्यातील व्यवसायांना परवानगी, शिर्डीतील साई मंदिर मात्र बंदच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । आजपासून अहमदनगर जिल्हयातील सर्व व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र साई मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले झाल नाही आहे.राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

करोनाचे राज्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर 5 एप्रिल साईबाबांच मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आल. साई मंदीरातील दैनंदीन पूजा विधी सुरु आहेत. आता लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर इतर शहरं तशीच गावे पुर्वपदावर येतात मात्र शिर्डीचे समिकरण हे वेगळ आहे.साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत त्यामुळे अनलॉक झाल तरी मंदीरच खुल नसल्याने व्यवसाय सुरू करून उपयोग नाही अशी अवस्था आहे.

शिर्डीवर आसपासचे शेतकरी शिर्डीतील हॉटेल्स हातावर काम करणारी अनेक लोक, हार फुल प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट अश्यांची आर्थिक गणित गेल्या नऊ आणि आताच्या अडीच महीण्याच्या लॉकडाऊनमुळे बिघडलेल आहे. त्यामुळे साईमंदिर खुले करावे ही मागणी जिल्ह्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर जोर धरू लागली आहे.

अहमदनगर जिल्हयातील सर्व व्यवसाय 7 जुन 2021 पासुन सुरू होणार असल्याची माहीती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आदेश जारी केले. मात्र मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *