महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । न्यूझीलंडच्या विरुद्धच्या कसोटीतून पदार्पण पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा इंग्लंडचा जलद गती गोलंदाज ऑली रॉबिन्सन विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. 27 वर्षाच्या जलद गती गोलंदाजाने 2012 ते 2014 या काळात लिंगभेद आणि वर्णभेदाशी निगडित ट्विट केले होते. रॉबिन्सनला टीम मध्ये सहभागी करण्यात आल्यावर सोशल मीडियावर त्याचे हे जूने ट्विट चर्चेचा विषय ठरले. वाद वाढत असल्याचे लक्षात घेत ECB ने रॉबिन्सनच्या विरोधात कडक पाऊलं उचलली आहेत.
इंग्लंडचे बँटिंग कोच ग्रॅहम थोर्पने सांगितले की, क्रिकेट संघात खेळाडूंना घेण्याआधी ECB त्यांचे सोशल हँडल तपासू शकते. थोर्पने सांगितले की, पहिल्याच डावात चार विकेट घेणाऱ्या रॉबिन्सन याने आपली चूक मान्य करत माफी देखील मागितली आहे.
कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेतच माफी मागितील. रॉबिन्सन म्हणाला की, ‘मला खेद वाटतो आणि अशा प्रकारची विधानं केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’ आपण जीवनातील खडतर काळातून जात होतो. यॉर्कशायरने त्याला टीममधून बाहेर काढले होते. त्याच काळात हे ट्वीट केले होते.ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले की, एखादा क्रिकेटर अशी विधान करतो हे भयंकर असून त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.