मावळ तालुक्यात आढळला रानगवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । मावळ तालुक्यातील (maval taluka) पाटण (patan) व भाजे (bhaje) डोंगर परिसरात रानगवा आढळून आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.(rangava was found in patan, bhaje in maval taluka) विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाटण व भाजे गावच्या डोंगरात रविवारी ग्रामस्थांना रानगव्याचे दर्शन झाले. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वनरक्षक व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिसरात गस्त घातली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

या रानगव्याकडून कोणतेही नुकसान झाल्याच्या तक्रारी नाहीत. वनविभागाचे वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी सांगितले की, पवन मावळातील मोरवे भागात रानगव्याचे पहिल्यापासून अस्तित्व आहे. भटकत-भटकत तो पाटण-भाजे डोंगर परिसरात आला असावा. तो शांत स्वभावाचा प्राणी असून, त्याच्यापासून आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याच्या तक्रारी नाहीत. नागरिकांनी त्याचा पाठलाग करू नये अथवा त्याला डिवचू नये. तसे केल्यास तो चवताळू शकतो. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *