ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip kumar) यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दिलीप कुमार यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दिलीप कुमार हे व्हेंटिलेटरवर आहेत अशी चर्चा सुरू होती. याबद्दल डॉक्टर जलित पारकर यांनी माहिती दिली आहे. ‘दिलीप कुमार हे व्हेंटिलेटरवर नाहीत तर ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना सध्या श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनचा आधार घ्यावा लागतोय. त्यांना बायलॅटरल प्लुरल इन्फ्यूजनचा त्रास असून त्याचं आम्ही बारकाईने निरीक्षण करत आहोत’, असं ते म्हणाले. (Dilip kumar is on oxygen support not on ventilator says doctors)

सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा परसत होत्या. याच पार्श्वभूमीवर दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. ‘व्हॉट्स अॅप फॉरवर्ड्सवर विश्वास ठेवू नका. साहेबांची प्रकृती आता बरी आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मनापासून आभार. डॉक्टरांच्या मते त्यांना दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज मिळेल’, अशी माहिती देण्यात आली.

रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *