महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Honda Sports EV Concept Car S660s in under production, launch Soon)
होंडा इलेक्ट्रिक टू व्हिलर स्कूटरच्या यादीमध्ये आता आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव समाविष्ट केले गेले आहे. होंडा बेन्ली ई (Honda Benly E) असे या स्कूटरचे नाव असून नुकतीच ही स्कूटर टेस्टींगदरम्यान पाहायला मिळाली आहे. तथापि, कंपनीकडून नव्हे तर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (ARAI) या स्कूटरचं टेस्टिंग सुरु होतं.
या स्कूटरच्या डिझाइनमध्ये फ्रंट अप्रॉनवर बास्केट, मागील बाजूस फ्लॅट लोडिंग डेक, 60 किलो पेलोड क्षमता इत्यादींचा समावेश आहे. जर आपण या स्कूटरच्या वैशिष्ट्यांविषयी बोललो तर त्यामध्ये एलईडी लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि चार्जिंग सॉकेट इत्यादी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
Honda Benly e मध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. ज्यापैकी एक 2.8kW इलेक्ट्रिक मोटर आणि दुसरी याहून अधिक पॉवरफुल 4.2 kW इलेक्ट्रिक मोटर आहे. या स्कूटरमधील बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 48V क्षमतेच्या दोन स्वॅपेबल बॅटरी देण्यात आल्या आहेत.
पहिल्या मोटरचा वापर केल्यास Honda Benly e सिंगल चार्जवर 87 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. परंतु या मोटरसह ही स्कूटर जास्तीत जास्त 30 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. तर दुसऱ्या मोटरद्वारे ही स्कूटर ताशी 60 किलोमीटर इतक्या वेगाने धावेल. परंतु या मोटरसह ही स्कूटर केवळ 47 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.
होंडा मोटर्स आणि स्कूटर इंडियाने या स्कूटरच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ARAI च्या चाचणीतून असे अनुमान काढले जाऊ शकते की, ही स्कूटर लवकरच भारतात लाँच केली जाऊ शकते.