जबरदस्त फीचर्स सह Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार लॉन्च,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । Xiaomi Mi 11 Lite लवकरच हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. जागतिक बाजारात हा स्मार्टफोन 5G सह लॉन्च करण्यात आला आहे. मात्र हिंदुस्थानात हा फोन 4G व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Lite & Loaded या टॅगलाईनसह कंपनी या स्मार्टफोनचे प्रमोशन करत आहे.कंपनी 22 जून रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. याबाबत कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन 2021 मधील सर्वात स्लिम आणि लाइटवेट फोन असल्याचे बोलले जात आहे.

Mi 11 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.55-इंचचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले पंच-होल डिझाइनसह देण्यात आला असून याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनच्या 4G व्हेरिेएंटमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन 732 चिपसेट देण्यात आले आहे. तसेच याच्या 5G मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 780 जी चिपसेट देण्यात आले आहे.

कॅमेरा आणि किंमत
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सरसह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी या फोनची किंमत 25 हजार इतकी ठेवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *