Unlock नंतर ‘महाराजा’चं शूट सुरु ; जुनैद आमिर खान बॉलिवूडमध्ये यायला सज्ज;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आमिर खानचा मुलगा (Aamir Khan Son) जुनैद खान(Junaid Khan) बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समजली होती. आत्ता त्याचा पहिला चित्रपट ‘महाराजा’ चं शुटींगसुद्धा सुरु झालं आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शुटींग रखडल होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये शुटींगला परवानगी दिल्यानंतर, कोरोना नियमांचं पालन करून या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करण्यात आली आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार 25 कलाकार आणि मोजकेच क्रु मेम्बरसोबत हे शुटींग केलं जाणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार मुंबईच्या मरोल भागामध्ये या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. 100 लोकांची टीम सध्या यामध्ये कार्यरत आहे. या सगळ्या स्टाफची कोरोना चाचणी करून, त्यांना कोरोना लशीचा पहिला डोससुद्धा देण्यात आला आहे. यामध्ये शुटींगसाठी फक्त 25 ज्युनियर कलाकारांनाच घेण्यात आल आहे. तसेच प्रोडक्शन हाउसमधील अत्यंत महत्वाची लोकचं सेटवर असणार आहेत.

 

‘महाराजा’ हा चित्रपट 1862 च्या एका लिबेल केसवर आधारित आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद यामध्ये एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. करसनदास मुलजी असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे. जुनैदसोबत या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडेदेखील असणार आहे. शालिनीने यापूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात काम केल आहे. तसेच शर्वरी वाघ, जयदीप अहलावत यांच्यादेखील मुख्य भूमिका असणार आहेत.

 

सध्या आमिर खानच्या मुलामध्ये मोठा फरक दिसून येत आहे. जुनैद आत्ता पूर्वीपेक्षा जास्त फिट आणि सक्रीय झालेला दिसूनयेत आहे. त्याचं वजनदेखील बऱ्यापैकी कमी झालेलं दिसत आहे. चाहत्यांनाही पाहून आश्चर्य वाटत आहे. बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खाननंतर आत्ता त्याच्या मुलाला अभिनय करताना पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *