महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे पुण्यात आज नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद कमी अन् कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचे या कमी झालेल्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.काल दिवसभरात पुण्यात 333 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 535 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.