राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नाशिकात समर्थकांचा ‘मनसे’ उपक्रम; पेट्रोल दर निम्म्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून – देशात इंधनदरवाढीचं सत्र सध्या सुरुच आहे. अशातच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत तर पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. अशातच मनसेच्या वतीनं राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने 53 रुपयांत एक लीटर पेट्रोल दिलं जात आहे.

नाशिक शहरात आज पेट्रोलचा दर 103 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 93 रुपये 65 पैसे आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी वाहनचलकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्तानं डोंबिवलीत 1 रुपयांत पेट्रोल विक्री करण्यात आली होती. तर आज 53 रुपयांत पेट्रोल विक्री सुरु असल्यानं नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *